“मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीला नियमितपणे सहकार्य करणाऱ्या राम गायकवाड आणि पोपट भोसले यांच आदर्श राज्यातील पदाधिकाऱ्यांनी घ्यावे” : मधुकर मेहकरे

सोलापूर : प्रतिनिधी (सिंदखेडराजा)
जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ सृष्टीला सोलापूर मधून जेष्ठ कार्यकर्ते राम गायकवाड आणि पोपट भोसले यांच्या नियोजनाखाली प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात साहित्य भेट देण्यात येते.
यंदाच्या वर्षी मान्यवरांच्या साठी उभारण्यात आलेल्या ८ निवासी खोल्या मधील फर्निचर भेट देण्यात आले. यात १६ बेड १६ बेडशीट १६ गादी १६ खुर्च्या १६ रजई, ८ टि पाॅय यांचा समावेश होतो. जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून मागिल बारा वर्षांपासून समाज बांधवांच्या सहकार्याने चादर, गादी, चटई, मॅट, खुर्च्या आदी उपयुक्त साहित्य देण्यात आले आहे. नियमित येणाऱ्या पर्यटकांची आणि पदाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हे साहित्य उपयोगाला येते.
राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असं काम मागील अनेक वर्षांपासून राम गायकवाड आणि पोपट भोसले या जेष्ठ कार्यकर्त्यांनी चालू केले आहे. कोणतेही पद नसताना ही संघटनेवर प्रेम करणारे सामाजिक बांधिलकी जपणारे हे मावळे सेवा संघासाठी आदर्श आहेत. असे मत जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकरे यांनी व्यक्त केले.
यंदाच्या साहित्य स्विकृतीसाठी जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे , संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे , महासचिव सौरभ खेडेकर, सेवा संघाचे महासचिव नवनाथ घाडगे, कोषाध्यक्ष अशोक पाटोकर, जिजाऊ सृष्टीचे इंजी पुरुषोत्तम कडू, व्यवस्थापक सुभाष कोल्हे रविंद्र चेके जेष्ठ विचारवंत लेखक प्रेमकुमार बोके, अकोला सेवा संघाचे संदिप निर्मळ, पुरुषोत्तम जाधव, सौरभ भांड आदी पदाधिकारी उपस्थित होते.