सोलापूरमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

शिवतीर्थ पुरस्काराचे वितरण, जातीय तेढ कमी होण्यासाठी तिळगुळ समारंभाचे कार्यक्रम व्हावेच : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी

अलीकडच्या काळात जातीय तेढ वाढ चालण्याच्या घटना घडत आहेत. अशा काळात तिळगुळ समारंभा सारखे कार्यक्रम होणे गरजेचे असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील जातीय तेढ कमी होण्यासाठी मदत होईल. असा विचार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी प्रशालेत मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने आयोजित तिळगुळ समारंभ व शिवतीर्थ पुरस्काराचे वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ह भ प प्रकाश महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सरचिटणीस प्रा.महेश माने यांनी केले.

यावेळी शिंदे यांनी यापूर्वीचे राजकारण आणि आत्ताचे राजकारण बदललेल्या यावरही प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगत सपाटे यांनी ऍड . एकनाथ माने, अंबादास सुरवसे या दोघांनी संस्थेच्या उभारण्यात दिलेले योगदान व निर्मलाताई ठोकळ यांचे वेळोवेळी संस्थेसाठी लाभलेले मार्गदर्शन सांगून पुरस्कार प्राप्त अन्य सत्कारमूर्तींचेही अभिनंदन केले. यावेळी प्रमुख वक्ते बोधले महाराजांनी संक्रांत अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास असण्याचे सांगून तिळगुळाचे हे महत्त्व विशद केले.

यावेळी कै.ऍड. एकनाथ तुळशीदास माने कै.अंबादास दाजीबा सुरवसे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या परिवाराच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आली. तसेच माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, आमदार अभिजीत पाटील, यांचा शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी चेतन नरोटे, ऍड .धनंजय माने, नागनाथ सुरवसे, ऍड .अमर पाटील, उदयन जाधव, दिलीप सुरवसे, विनायक पाटील, महादेव गवळी, अशोक चव्हाण, शिवदास चटके, नामदेव थोरात, सुनिता साळुंखे, रेखा सपाटे, प्रा महेश माने, ज्ञानेश्वर सपाटे, प्रा मधुकर पवार, तानाजी माने मोहम्मद शेख, सुजाता जुगदार, उषा गोखळे, महानंदा सोलापूरे, दत्ता भोसले. प्रा.युवराज सुरवसे, प्रा.संतोष गवळी आदि समाज बांधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!