महेश कोठे यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांची सांत्वनपर भेट, आमदार राजू खरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी
माजी महापौर, माजी सभागृह नेते, माजी विरोधी पक्षनेते, सोलापुर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिवंगत नेते महेश कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळेंनी दिवंगत नेते महेश कोठे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली कै.महेश कोठेंच्या प्रति सांत्वना व्यक्त केले.
यावेळी बोलताना खा.सुप्रिया सुळेंनी कै.महेश कोठेंच्या आठवणीला उजाळा देत महेश कोठेंना श्रध्दांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या परिवाराच्या कायम पाठीशी राहील सोलापुरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न येणारी पोकळी त्यांच्या निधनाने निर्माण झाली असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
महेश कोठे आणि आमचे कुटुंबाचे दशकाचे संबंध आहेत मला अजूनही खरं वाटत नाही असं वाटतं फोटोतून पाहून ते हसतील. अत्यंत मनमिळावू, कामाला वाट, अत्यंत उत्साह असायचा माणूस गेला. अत्यंत अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबाला आणि संघटनेला आला आहे. त्यांची पोकळी भरून निघेल असं मला वाटत नाही. यावेळी मोळचे आमदार राजू खरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.