26 सप्टेंबर सोलापूर बंद, मनोज जरांगे पाटिल यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजातर्फे सोलापूर शहर व जिल्हा बंद

सोलापूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हाच्या वतीने दि.26.09.2024 वार गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा OBC मध्ये समोवश करावा तसेच सगेसोयरे सह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मा. मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसापासून उपोषनाला बसले आहेत. परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओ.बी.सी. यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवल्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषन सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
गेल्या 8 दिवसापासून मनोज दाराचे उपोषन चालू आहे परंतु सत्ताधारी लाडकी बहीन योजनेचे मेळावे घेण्यात मग्न आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठ्यांना फक्त आवश्वासने अवलंबले आहे. मराठा समाज मा. मनोजदादा जरांगेच्या नेतृत्वाखाली गेल्या । वर्षभरापासून आंदोलन करत आहे. परंतु शासणाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा लढा संपवायला हवा होता परंतु शासन मराठ्यांनी न मागीतलेले 10% आरक्षण देऊन समाजाची बोळवणे करत आहे ते मराठा समाजाला मुळीच मान्य नाही. त्यामुळे सरसकट मराठ्यांचा जोपर्यंत कुणबी मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे.
सत्ताधारी मराठा आणि OBC यांच्यात भांडणे व्हावीत म्हणून हाके आणि इतर लोकंना अंतरावली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपोषनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठा व OBC यांच्या मध्ये विनाकारण वाद होत आहे.
या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी 26 सप्टेंबर-2024 रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले, आप्पासाहेब सपाटे महादेव गवळी, प्रकाश ननवरे, विलास लोकरे, आधी उपस्थित होते.