बार्शी शहरातील अद्ययावत मराठा मंदिराचा लोकार्पण सोहळा, आमदार राजेंद्र राऊत यांचे कार्य कौतुकास्पद लखुजीराजे जाधव

सोलापूर : प्रतिनिधी
लखुजीराजे जाधव (सिंदखेडराजा) यांचे वंशज बाबाराजे जाधवराव, रणजितसिंहराजे जाधवराव, रणजितसिंह नाईकनिंबाळकर, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील, आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.
मराठा मंदिर उभारणीस भरीव आर्थिक मदत केल्यामुळे सकल मराठा समाजातर्फे मराठा भुषण आमदार राजेंद्र राऊत यांचा सकल मराठा समाज व मराठा एकता मंडळ बार्शी यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
बार्शी शहराच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या मराठा मंदिरच्या वास्तूची उभारणी मोठ्या दिमाखात आणि युद्ध पातळीवर करण्यात आली तसेच मराठा समाजाची अस्मिता असणारा मराठा मंदिराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता
परंतु बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नातून मराठा मंदिरचा अध्यायवत वास्तूचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी मराठा आरक्षण समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुभाष जावळे,मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे, अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे, संस्थापक अध्यक्ष संभाजी सेना सुधाकरराव माने, प्रदेशाध्यक्ष अ.भा.मराठा सेवा संघ विजयसिंह महाडिक, प्रदेशाध्यक्ष शंभूराजे युवा क्रांती संघटना सुनिल मोरे,
प्रदेशाध्यक्ष संभाजी सेना रामेश्वर शिंदे, संस्थापक अध्यक्ष छावा महासंघ धनाजी येळकर पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनिल रसाळे, दास शेळके, दिलीप कोल्हे, बाळासाहेब गव्हाणे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, सर्व देशमुख परीवार यांच्यासह सकल मराठा समाज व मराठा एकता मंडळाचे सर्व पदाधिकारी व बार्शी शहरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.