सोलापूरक्राईममहाराष्ट्र

चोरीस गेलेला ट्रॅक्टर 4 दिवसात शोधला, सलगर वस्ती पोलीस ठाणे DB पथकाने आरोपींना केले अटक

सोलापूर : प्रतिनिधी

२९ में २०२४ रोजी तक्रारदार नामे पाडुरंग खंडु हरनावळे यांनी सलगरवस्ती पोलीस ठाणेस येवुन २८ में २०२४ रोजी रात्री ११.०० ते २९ में २०२४ रोजी सकाळी ०८.०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदार यांचे ताब्यातील २,५०,०००/- रु एक लाल रंगाचा महिंद्र अर्जुन ६०५ कंपनिचा ट्रॅक्टर त्यांचा आरटिओ पासिंग क्र. MH १३ DT २००८ हा रतिकांत कृषी केंद्रा समोर लावलेला ट्रॅक्टरचे लॉक कशाचे तरी लॉक काडुन फिर्यादीच्या संमती वाचुन मुददाम लबाडीने चोरुन नेले आहे. म्हणुन वगैरे मजकुर च्या तक्रारी वरुन गुन्हा नोंदवुन त्या अनुषंगाने तपासास सुरुवात केली.

गुन्हा दाखल होताच सलगरवस्ती पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन संशयीत इसम, गावातील नागरीक यांचेकडे विचारपुस चालु करुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे तपास करुन तसेच मिळालेल्या माहीतीवरुन तांत्रीक माहीती उपलब्ध करुन घेवुन त्याचे आधारे आरोपीचा शोध घेतला असता घटनास्थळावर आरोपी नामे १) विकी दशरथ गायकवाड याचा मोबाईल नंबर चे लोकशन मिळाल्याने त्यांनी घटनास्थळावरुन केलेल्या कॉलच्या आधारे माहिती घेतली असता घटनास्थळावर आरोपी विकी गायकवाडचे मित्र नामे २) अजय येशु जाधव व ३) अनिल नागेश गायकवयाड ४) राहुल (पाहिजे आरोपी) हे गुन्हा घडताना घटनास्थळावर असल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपींना ताब्यात घेतल्या नंतर त्यांनी नमुद ट्रक्टर चोरी केल्याचे सांगितले. तसेच सदर ट्रक्टरची विक्री करुन येणाऱ्या पैसेचे समान वाटप करायचे ठरवले होते.

चोरीस गेलेला ट्रक्टर हा आरोपीचे मित्र ५) सोमशेखर आमोगसिध्द लोहार रा. मु.पो. तडवळ, 1. अक्कलकोट जि. सोलापूर याचे गॅरेजमध्ये ट्रक्टर मध्ये बदल करुन विक्री करण्याच्या उददेशाने ठेवलेला होतो. सदरचा ट्रक्टर ओळखता येवु नये म्हणुन नंबर प्लेट व वरील टप सुध्दा काढून टाकलेला होता. यातील आरोपी क्रमांक ०५) सोमशेखर लोहार हा त्यांचे मित्र ०६ सिध्दाराम शंक बनसोडे ०७. मयुर (पाहिजे आरोपी) यांना सदरचा ट्रक्टर हा चोरीचा आहे हे माहिती असताना सुध्दा सदरचा विक्री ऊन येणारे उत्पंन्न सर्व १ ते ०७ सात आरोपी वाटुन घेणार होते असे तपासात निष्पन्न झाले आहे.

वर नमुद आरोपी कडुन २,५०,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परि), विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त विभाग ०२, अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, पोलीस उप-निरीक्षक गोविंद पवार, पोहेकॉ बालाजी पोतदार, पोना/अयाज बागलकोटे, पो.कॉ. अर्जुन गायकवाड पो.कॉ. अविनाश डिगोळे, पो. कॉ. बाबुराव क्षिरसागर, पो.कॉ. सागर गायकवाड, पो.कॉ. दिपक साळुंखे, पो.कॉ.सागर बोरामणीकर, पो.कॉ.जयभिम कांबळे बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!