चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलांकडून ०८ गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कामगिरी
महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शिलावती काळे, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे यांचे विशेष कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
मागील कांही दिवसापासुन सोलापूर शहरामध्ये अनोळखी बुरखाधारी महिलांनी, सोलापूर शहरातील सोने-चांदीचे दुकानामध्ये जावुन, दुकानदाराचे लक्ष विचलीत करुन हातचलाखीने सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी करण्याचे सत्र सुरु केले होते. वरिष्ठांनी सदर बुरखाधारी महिला आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने, गुन्हे शाखेकडील पो.उप.नि./अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी, चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाचे आसपासचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदार यांचे मार्फतीने माहिती काढुन, २८ में २०२४ रोजी, या गुन्हयातील संशयित महिला नामे (१) संगीता शेखर जाधव, यय ४५ वर्षे, रा. घर नं. ५८, चर्च जवळ, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर, (२) गौराबाई बब्रुवान जाधव, वय ७५ वर्षे, रा. घर नं. २४२, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर, (३) मंजुश्री उर्फ बेबी सुनिल जाधव, वय ४० वर्षे, रा. घर नं. २४२, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यामध्ये, आणखी एक महिला नामे (४) राणी अजय गायकवाड, रा. धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलपूर असे ०४ महिलांनी बुरखा परिधान करून, २४ में २०२४ रोजी, अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्स चे दुकानात दागिने खरेदी करणेचे बहाण्याने जावून, तेथील दुकानदाराची नजर चुकवुन सोन्यांचे दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे, वरील नमूद अ.क्र. ०१ ते ०३ महिलांना, २८ में २०२४ रोजी अटक करण्यात आली.
त्यानंतर, पोउपनि/अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी, नमूद महिलांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, नमूद महिलांनी सोलापूर शहरातील आणखी ०७ सोन्या-चांदीचे दुकानातुन, अशाच प्रकारचे चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे, त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले २८.७५० ग्रॅम सोन्याचे दागिने व १५५ तोळे चांदीचे दागिने असे एकूण २,९५,२००/- रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केलेले आहेत तसेच नमूद महिलांनी चोरी करताना वापरलेले ०३ बुरखे देखील जप्त करण्यात आले आहेत. सदर महिला आरोर्पाकडुन, सोलापूर शहरातील खालीलप्रमाणे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पो.उप.नि/अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, सिध्दाराम देशमुख, वसिम शेख, सतिश काटे, महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शिलावती काळे, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.