स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता शिबिर संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी सुरुवातीस बारचे अध्यक्ष ॲड.अमित आळंगे यांनी त्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी त्यांच्या मनोगतात महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग मधील विविध गोष्टी सांगून स्वच्छते बद्दल देखील त्यांनी त्यांच्या जीवनात दिलेले महत्त्व विशद करून सांगितले. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर संपूर्ण देश आपोआप स्वच्छ होईल आणि आजपासून आपण संकल्प करूया की आपण आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर आणि ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवू.
बारचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बारमध्ये केलेल्या स्वच्छते बद्दल सांगून उपस्थित सर्व वकिलांना गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा न्यायालयातील सर्वच न्यायाधीश वर्ग आणि बहुसंख्य वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते. उपस्थित सर्व न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वृंद आणि वकिलांनी संपूर्ण जिल्हा न्यायालयातील परिसर स्वच्छ केले.
ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. एल. एन. मारडकर, ॲड. महेश सोलनकर, आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमा वेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे सह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल व आभार खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.