बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळेच आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे : ॲड सुरेश गायकवाड

सोलापूर : प्रतिनिधी
स्वर्गीय हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. सोलापूर पूर्व विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच अस्मिता व्हीजन परिवार यांच्या कडून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड यांनी सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचे काम स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांनी केले. त्यांनी प्रस्थापितांचे अस्तित्व संपवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले, सर्वसामान्य माणसाला सत्तेचा वाटा मिळवून दिला सर्वसामान्यांचा मान, मनका मस्तक आणि मनगट सशक्त करण्याचे काम देखील त्यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारामुळेच आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे, असे सांगून स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचले पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित शहर प्रमुख उत्तर स्वाती रुपणार, शहर प्रमुख मध्य प्रीती नायर, उप शहर प्रमुख मध्य अनिता राठोड, दीपाली पवार, शाखा प्रमुख सुनीता राठोड, पूनम चव्हाण, क्षेत्रप्रमुख शशिकला चिवडशेट्टी, तालुका उप प्रमुख महानंदा अंबालगी, युवासेना प्रमुख योगीराज चिवडशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते सदाम शेख, विरेश बिराजदार, या सर्वांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन करून बाळासाहेब परत या.. परत या.. बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. अशा घोषणा देण्यात आले.