दिलीप कोल्हे यांनी शासनाच्या विविध योजना राबवून महिला आणि कामगारांची जिंकली मने

सोलापूर : प्रतिनिधी
तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक माजी उपमहापौर तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून लक्ष्मी विष्णू चाळ आणि प्रभाग क्रमांक सहा मधील महिला आणि कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आज तागायात राबवल्या.
आज 15 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता विष्णू चाळ सुभद्रा नगरी येथे बांधकाम कामगार मंडळामार्फत 251 कामगारांना संसार किट भांडीवाटप, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील 200 लाभार्थ्यांचा मोफत फॉर्म भरून दिला. यापूर्वी केलेल्या सत्तर लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे यासह लाडक्या बहिणीच्या माध्यमातून प्रभागातील हजारो महिलांना लाभ मिळवून दिला. लक्ष्मी चाळ डोणगाव रस्ता येथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शुभारंभ केला.
हा दवाखाना अत्याधुनिक सामग्रीसह अद्यावत करण्यात आलेला आहे शासनाच्या निधीसह दिलीप कोल्हे यांनी स्वखर्चातून काही साहित्य दवाखान्यात भेट दिली आहेत. यासह प्रभाग क्रमांक सहा मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, सिजर झालेल्या महिलांना 20000 आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिलांना 15000 अनुदान मिळवून दिले, लग्नासाठी 51 हजार रुपये अनुदान शेकडो लाभार्थ्यांना मिळवून दिले.
या सर्व शासनाच्या योजनांचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाळ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजश्री कांबळे, महापालिका आरोग्य विभागाचे डॉ बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ चौघुले, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर शितोळे, वैद्यकीय कक्ष प्रमुख जवाहर जाजू, दत्तात्रय बडगंची, महेश कुलकर्णी, शिवसेना महिला आघाडीच्या सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार दिलीप कोल्हे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला, मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात आला. यासह बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना जाधव, वनिता कदम, मंगल डोंगरे, कविता चव्हाण, आरिफ निगेबान, रनजीत कोल्हे, सलीम पठाण, मंगेश डोंगरे, युवराज घाडगे, रणवीर कोल्हे, पार्थ कोल्हे, बाळासाहेब सुरवसे, कल्लप्पा कामाने, मधुकर पाटील, सतीश म्हस्के, ज्ञानेश्वर शिंदे, उमाकांत निकम, अतिश चव्हाण, राहुल काटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शेकडो महिला आणि कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.