अमोल शिंदे यांचा पुढाकार.. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या समवेत बोरामणी विमानतळ आयटी पार्क यासह विविध विषयांवर चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देच त्यांचे सोलापुरात स्वागत केले.
सोलापूर शहरांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रामुख्याने बोरामणी विमानतळ सुरू व्हावे, सोलापुरात IT पार्क सुरू व्हावे, सोलापूर ते मुंबई विमान सेवा तात्काळ सुरू व्हावी या प्रमुख मागण्या मांडत सोलापुरातील अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा केली. यावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.