नवी पेठ येथील शिवतेज शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या उत्सवा अध्यक्षपदी मिथुन कामत यांची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर नवी पेठ येथील शिवतेज शिवजन्मोत्सव युवक मंडळ संस्थापक अजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवजन्मोत्सव नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली.
शिवतेज शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या उत्सवा अध्यक्षपदी मिथुन कामत, उपाध्यक्ष अभिषेक फताटे, निलेश बलरामनवर, खजिनदार विश्वजित शिंदे, सचिव महेश ताकभते, कार्याध्यक्ष गणेश परदेशी, कार्यक्रम प्रमुख राजू खुर्द, राम चंद्रबन्सी, सल्लागार उमेश ताकभते, मनोहर दासरी, उमेश मोहिते, राजकुमार परदेशी यांची निवड एकमताने करण्यात आली या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शिवजयंती निमित्ताने विविध उपक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. व्यापारी, महिला तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर खेळाडू यांच्या हस्ते रोज पूजा करण्यात येणार आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी प्रसादवाटप तसेच विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहे.
यावेळी नवीपेठ परिसरातील व्यापारी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाचे मार्गदर्शक सुजित शिंदे यांनी प्रास्ताविक केले व मंडळाचे प्रमुख निलेश शिंदे यांनी आभार मानले.