क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर
ॲड विजय शिंदे आणि ॲड मनोज पामुल यांचा काॅ.फातिमा बेग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन केले सन्मानित

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशन सोलापूर च्या कार्यालयात सोलापूर बार असोसिएशन सोलापूर चें अध्यक्ष पदी ॲड विजय शिंदे यांची निवड झाल्या बद्दल तसेच सचिव म्हणून ॲड मनोज पामुल यांची नियुक्ती झाल्या निमित्त काॅ.फातिमा बेग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कुंभारी सोलापूर या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अफसाना बेग तसेच बारचे सदस्य अँड. डि.के.भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना काॅ.फातिमा बेग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कुंभारी सोलापूर संस्थेचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यांवेळी बारचे सदस्य अँड. अंबादास कंदिकोंडा, अँड. बंडू सटाले, अँड. सुजित उड्डाणशिवे,अँड. अश्विनी शिंदे, अँड. पैलवान सर, अँड. चांदसाब शेख, अँड. सहदेव भडकुंभे आदिंची उपस्थिती होती.