त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त BS सोशल फाउंडेशनच्या वतीने घेतलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : राजाभाऊ सरवदे

सोलापूर : प्रतिनिधी
बी एस सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते मूर्तीची पूजन करून करण्यात आलं.
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त BS सोशल फाउंडेशनच्या वतीने घेतलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून संस्थेचे मार्गदर्शक अश्विन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने फाउंडेशन चे काम उत्तम सुरू असल्याचे मत राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केले.
यावेळी सुबोध वाघमोडे, के डी कांबळे, नागेश रणखांबे, शिवम सोनकांबळे, माजी नगरसेवक दिपक निकाळजे, राजाभाऊ कदम, महादेव बाबरे, सुग्रीव जेटीथोर, बीएस सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक बसवराज सोनकांबळे व मार्गदर्शक अश्विन गायकवाड, सुधीर बिडबाग, महेश गजधाने, नितीन हालसंगे,
बी.एस सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यश शिवशरण, प्रेम शिवशरण मंडळाचे अध्यक्ष आतिश शिरसाट, अजय कसबे, पृथ्वीराज शिवशरण, संदीप इंगळे, बॉबी कांबळे, चिराग शिवगदगे, केतन शिवशरण, विनीत शिवशरण, प्रमोद आदित्य कांबळे, व्यंकटेश चिपा, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.