त्रिवेणी संगम भजनी मंडळाचे पंढरपुरात भजन सोहळा

सोलापूर : प्रतिनिधी
माघवारी निमित्त पंढरपुरात श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळ, श्री सिद्धारूढ भजनी मंडळ व मिरास्मृती भजनी मंडळ पुणे अशा तिन्ही त्रिवेणी संगम भजनी मंडळाचे कार्यक्रम पंढरपूर येथील, अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळेत, भजन सोहळा साजरा करण्यात आला.
श्री मार्कंडेय दिंडी संस्था सोलापूरच्या वतीने माघवारी, दिंडी सोहळा कार्यक्रमानिमित्त ०७ फेब्रुवारी २०२५ शुक्रवार रोजी अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळेत, रात्री १० ते १२, श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळ सोलापूर, श्री सिद्धारूढ भजनी मंडळ, मिरास्मृति भजनी मंडळ पुणे, असा त्रिवेणी संगम भजन सोहळा पार पडला. या सोहळ्यात विष्णू कारमपुरी, श्रीनिवास चिलवेरी, लक्ष्मण देविदास, अनिता देविदास, वासू यलदंडी, बालाजी कोटा, चंद्रकांत लिंबोळे, नागनाथ कारमपुरी, यशवंत जाणा, धीरज देविदास, मुनिनाथ कारमपुरी, यांनी तेलगू , मराठी भावगीते व आध्यात्मिक गीते, सादर करून हजारो भाविक बंधू भगिनींची दाद मिळवली.
श्री मार्कंडेय दिंडी संस्था, सोलापूर यांनी आयोजित केलेला भजन सोहळा यशस्वी करण्यासाठी शुभम वड्डेपल्ली, शुभम कारमपुरी, राकेश देविदास, धीरज पेंद्याल, नागार्जुन कुसुरकर, रमेश संचू, आणि तिन्ही भजनी मंडळाच्या महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.