रवी पवार यांच्या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र होते कौतुक, विशेष स्वच्छता मोहीम 2.0 मोहिमेला सुरुवात

सोलापूर : प्रतिनिधी
विशेष स्वच्छता मोहीम 2.0 या अंतर्गत शहरातील अंतर्गत रस्ते साफसफाई सुरू करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी पर्यंत या मोहिमेमध्ये विविध भागात मोहीम घेण्यात आली आहे. हि विशेष स्वच्छता मोहीम 2.0 राबविण्यासाठी विशिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
10 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपूर्ण एस.टी. स्थानक परिसर, अवंती नगर (बेंगलोर बेकनरी) ते बलदवा हॉस्पिटल ते राजे गणपती, सोना हिरा चौक (कस्तुरबा मार्केट कॉर्नर) ते बलिदान चौक, रेल्वे स्टेशन भाजी मार्केट परिसर,
हॉटल अॅम्बेसेडर ते निराळे बम्ती पूल, सम्राट चौक ते भीमरव चौक (हनुमान नगर), डोंगरे पान दुकान ते बर्फ कारखाना, विनायक लॉज बोळ परिसर, छ. शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिरवणूक मार्गावरील साफसफाई करणे, मरम्वती चौर, दन चौक ते चौपाड,
बाळे ब्रिज ने सर्विस गेड दोन्ही बाजू असे शहरातील अंतर्गत रस्ते साफसफाई करण्यात येणार असून याची सुरवात देखिल केली आहे. अशी माहिती सोलापूर महापालिकेची अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली.