श्री नवदुर्गा माता मंदिराचे कळसारोहण मोठ्या भक्तीभावाने संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिराच्या कळसारणाचे कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी काशी ज्ञानपीठाचे श्री श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते कळसा रोहणाचा कार्यक्रम पार पडला.
तत्पूर्वी गण यज्ञ व चंडी यज्ञ पहाटेपासून सुरुवात झाली त्यानंतर महाराजांच्या हस्ते कळसा रोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराजांनी आपल्या आशीर्वाचनात सर्व भक्तांनी देव देश धर्मासाठी काम करावे, आपण या भूतलावर आलो तर या समाजाचं काही देणं लागतं तसे केल्यास मोक्ष प्राप्त होते, त्याचबरोबर कळसा रोहणाचे महत्त्व म्हणजे उंच शिखरावर कळस मानव जातीच्या रक्षणाकरिता तथा देवीशक्तींना एकत्रित करण्याकरिता केला जातो. त्यानंतर मंदिराचे पूर्ण रूप साकार होते असे आशीर्वचन करत मंदिराच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्या नंतर ५००० लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार सागर अतनुरे यांनी केली या प्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, उदयशंकर चाकोते, सुरेश पाटील, राजू पाटील, बाबुराव जमादार, सिद्धेश्वर नाडार, संजय होमकर, भीमाशंकर पदमगोंडा, संगमेश गुंगे, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, बाळासाहेब वाघमोडे, नरेंद्र होमकर, जगदीश होनराव, प्रवीण वाले, संदीप कुर्ले, रमेश चव्हाण, यशवंत चव्हाण, महेश बुद्धे, चंद्रकांत सिंगराल, राजेश हवले, गणेश पांढरे, गजानन खटके, आशिष दुलंगे, गुरुराज पदमगोंडा, सतीश पारेली, नागेश कोळी, कल्याणराव चौधरी,मल्लिनाथ सोलापुरे,लखन सुरवसे,प्रशांत धनुरे,दत्ता गांधारे, ईश्वर हिंगमिरे, ऋतुराज वाघमोडे, संकेत अल्लोळी, मल्लिकार्जुन करजगी,वरद होमकर,ओम हवले यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व देवी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूनम होमकर, सौ.नाडार, सुलोचना हवले, महानंदा कलशेट्टी, कमल हिंगमिरे, सुनीता सुरवसे, राजश्री हवले, अनिता वाघमोडे,आशा होनराव, शैलजा बुद्धे, माधुरी बुद्धे, भाग्यश्री अतनूरे, स्नेहा अतनूरे, वैशाली धनुरे, लक्ष्मी गावडे, प्रीती शेटे,आरती पदमगोंडा,जगदेवी वारद,महानंदा अल्लोळी, राजश्री जक्कापुरे,प्रज्ञा ख्याडे, आरती बिद्री, ऋतुजा वाघमोडे, स्नेहा बुद्धे, सानिका बुद्धे, अबोली बडदाळ, निशिगंधा करजगी, अक्षता इंडे, वैभवी गावडे आदींनी परिश्रम घेतले.