श्री शिवजन्मोत्सव महामंडळाच्या मागणीला यश, नूतन शिवजन्मोत्सव मंडळांना पोलिसांच्या वतीने देणार परवानगी

सोलापूर : प्रतिनिधी
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली.
या बैठकीत नूतन शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवानगी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात येत नव्हती यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे यांच्या समवेत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून नूतन शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या मंडळास परवानगी द्यावी अशी मागणी केली त्या मागणी पोलीस प्रशासनाने सकारात्मकता दाखवत परवानगी देण्याचे कबूल केले.
मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना 19 तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, महामंडळाचे प्रमुख दिलीप कोल्हे, पुरुषोत्तम बरडे,
सुनील रसाळे, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, संजय शिंदे, बसवराज येरटे, नवनाथ भजनावळे, चक्रपानी गज्जम, राजू पाटील, महेश कुलकर्णी, विकास शिंदे,
शुभम धुमाळ, शरद येचे, रोहन पवार, महेश हनमे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.