नागरी बँक असोसिएशनची नवीन इमारत उभारणार : प्रकाश वाले
वीरशैव व्हिजन तर्फे प्रकाश वाले यांचा सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर नागरी बँक असोसिएशनची नवी इमारत उभी करणार आहे. त्यामध्ये आरबीआयचे नवीन नियम, धोरणे याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यात येणार आहे. कर्जवसुली बाबत सहकार खात्याचे एक न्यायालय असणार आहे. कर्जदारांनी त्यांचे कर्ज नियमित फेडले पाहिजेत असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे नुतन चेअरमन प्रकाश वाले यांनी केले.
श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले यांची सोलापूर नागरी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीरशैव व्हिजनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वीरशैव व्हिजनचे सचिव नागेश बडदाळ यांच्या हस्ते श्री वाले यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकार्याध्यक्ष राजेश निला, श्रीमंत मेरू, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, सिद्धेश्वर कोरे, बद्रीनाथ कोडगी-स्वामी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश नीला यांनी केले.