सोलापूरक्राईममहाराष्ट्र

MIDC डि बी पथकाने घरफोड्या करणाऱ्या आरोपीतांच्या आवळल्या मुसक्या, ०८ घरफोड्या उघडकीस आणत ३ लाख ५९ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्याची माहिती काढुन, तसेच आरोपीतांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणेकामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यानी सुचना दिल्या होत्या.

एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर हद्यीत सक्त पेट्रोलींग करुन, हस्ते परहस्ते, बातमीदारांचे मदतीने कसोशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहरकडील एकुण 08 गुन्हे उघडकीस आणुन एकुण 03 लाख 59 हजार 50 रुपये किं.चे सोने व रोख रक्कम जप्त हस्तगत करण्यात आली आहे.

यात आरोपी नंदकुमार विजय कोक्कुल, शाहु सिध्दप्पा काळे याला अटक केले असून एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पो.नि. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोहेकॉ राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना. मंगेश गायकवाड, पोकों सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी दिपक नारायणकर, अमोल यादव, आमसिध्द निंबाळ, देविदास कदम, अमर शिवसिंगवाले, भारत तुक्कुवाले यानी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!