सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

तब्बल ६३ हजार ६५३ जण झाले भाजपाचे सदस्य, आमदार देवेंद्र कोठे यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश

भाजपा सदस्य नोंदणीत 'शहर मध्य' ने मारली सोलापूर शहरात बाजी

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाने सोलापूर शहरात सर्वप्रथम नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करत बाजी मारली आहे. शहर मध्य विधानसभेला दिलेला ६० हजार ८०० नोंदणीच्या उद्दिष्टाचा टप्पा ओलांडून शनिवारी रात्री भाजपा शहर मध्य विधानसभेने तब्बल ६३ हजार ६५३ जणांची भाजपची सदस्यता पूर्ण केली.

भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार भाजपाच्या माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती, भारतीय जनता पक्षाने केलेला विकास सांगत भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन नागरिकांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तब्बल ६३ हजार ६५३ इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

गर्दीची ठिकाणे, महाविद्यालये, विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, शाळांबाहेरील विद्यार्थ्यांचे पालक, भाजी मंडई, हॉटेल अशा अनेक ठिकाणी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहाने सदस्य नोंदणी केली. सदस्य नोंदणी अभियान सुरू झाल्यापासून पहिल्या १० दिवसातच २५ हजार सदस्यतेचा टप्पा पूर्ण झाला. परंतु कोठे कुटुंबात दुःखद घटना घडल्यामुळे सदस्य नोंदणीच्या अभियानाची गती मंदावली होती. मात्र आमदार देवेंद्र कोठे पुन्हा सक्रिय होताच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षातील वरिष्ठांनी दिलेले नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावून नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण होताच शहर मध्य विधानसभेत शनिवारी रात्री ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. उद्दिष्टपूर्ती झालेली असली तरी पक्षाने दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश

भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये शहर मध्य विधानसभेने मुदतीपूर्वी पूर्ण केलेले उद्दिष्ट हे सर्व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ अन् संघटित प्रयत्नांचे यश आहे. या यशासाठी भाजपाच्या सर्व माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी मित्रपरिवाराने घेतलेल्या परिश्रमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन ! भाजपाच्या सदस्य नोंदणीप्रमाणे शहर मध्य विधानसभेच्या विकासाचेही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य विधानसभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!