शिवजन्मोत्सव निमित्त लिटिल किंग्डम प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा

सोलापूर : प्रतिनिधी
लिटिल किंग्डम प्रि-प्रायमरी स्कूल, 105 उमा नगरी मुरारजी पेठ येथील प्री प्रायमरी स्कूल मधील लहान चिमुकल्यांनी शिवराय मावळे यांची वेशभूषा करून स्कूलच्या परिसरातून रॅली काढण्यात आली यानंतर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार करून शिवजन्मोत्सव साजरा केला.
यावेळी चिमुकल्यांनी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला बालवेशातील शिवराय आणि मावळे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांच्या हस्ते लहान चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
हा शिवजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटिल किंग्डम प्रि-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमती जोजारे, शिक्षिका मनिषा श्रीराम, पुर्वा मुळे, वंदना महले, राणी निंबाळकर आणि कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.