केंद्र शासनाच्या बोट आणि सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये सामंजस्य करार, विद्यार्थ्यांना रोजगार नोकरीची संधी मिळणार

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (बोट) सेंटर या केंद्र शासनाच्या संस्थेशी (वेस्टर्न रिजन) आणि एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची स्वायत्त संस्था बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम क्षेत्र), मुंबई अर्थात बोट आणि सोलापूर एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला. याचा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) च्या अंमलबजावणीसाठी हा करार झाला. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हाॅलमध्ये या बोट (WR), मुंबई उपसंचालक एन.एन.वाडोदे आणि सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळेस उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. आर टी व्यवहारे, प्रदीप तापकीरे, विनोद खरात, ए के शेख, विजय बिरादार, एस एस शिरगण, इम्रान चंदरकी यांची उपस्थिती होती.
बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (वेस्टर्न रीजन) किंवा BOAT (WR) हे बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे प्रादेशिक कार्यालय आहे, जे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. यातून विद्यार्थ्यांचा सहभाग सुलभ करेल, आवश्यक पायाभूत सुविधा आणि समर्थन प्रदान करेल आणि प्लेसमेंटच्या संधींमध्ये मदत करण्यास मदत होणार आहे.
शेकडो कंपन्या ‘बोट’ अंतर्गत नोंदलेल्या आहेत. अभियांत्रिकीसह आता पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडून जॉब तथा रोजगार, नोकरीची संधी मिळणार आहे. विद्यार्थी आणि तरुणांसाठी विविध उद्योगांमध्ये शिकाऊ प्रशिक्षण योजना राबवणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि प्रशिक्षणार्थींमध्ये रोजगारक्षमता वाढवणे, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातील भागीदारी सुलभ करणे हे बोटचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
शिकाऊ उमेदवारांची नोंदणी आणि नोंदणी करणे, तसेच त्यांच्या प्रशिक्षणाचे निरीक्षण करणे, प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, मूल्यांकन आणि मूल्यमापन आयोजित करणे, प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देणे हे कार्ये आहेत.
प्रशिक्षणार्थी व्यावहारिक कौशल्ये मिळवतात, त्यांची रोजगारक्षमता वाढवतात, प्रशिक्षणार्थींना त्यांच्या निवडलेल्या उद्योगात प्रत्यक्ष अनुभव मिळतो, प्रशिक्षणार्थींना मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळतात, ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या शक्यता वाढतात, हे बोटचे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे आहे.
सिंहगड महाविद्यालय विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांत प्लेसमेंटच्या संधीसाठी प्रसिद्ध आहे. त्यात या केंद्र शासनाच्या बोट संस्थेशी करार झाल्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. रोजगारांची संधी वाढण्यास मदत होणार आहे.
– डॉ. शंकर नवले,
प्राचार्य, एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय