स्थापत्य २०२५ प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सतर्फे नॉर्थकोट मैदानावर भरविण्यात आलेल्या स्थापत्य २०२५ प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हजारो सोलापूरकरांनी स्थापत्य २०२५ प्रदर्शनाला भेट देऊन माहिती असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी दिली.
या प्रदर्शनात जागा विक्रीचे विविध प्रकल्प, प्रमोटर आणि बिल्डर, गृह कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, सिमेंट कंपन्या, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, स्टील, प्लंबिंग आणि सॅनेटरी वेअर, इलेक्ट्रिक मटेरियल, बांधकामास लागणारी अत्याधुनिक यंत्रे आणि उपकरणे, दरवाजे आणि खिडक्या, रूफिंग मटेरियल, टाईल्स, घरातील अंतर्गत सजावट फर्निचर, लँडस्केपिंग, सोलार एनर्जी, लिफ्ट अशा विविध प्रकारच्या उत्पादनांच्या स्टॉल वरून नागरिकांना माहिती स्थापत्य २०२५ प्रदर्शनातून मिळत आहे.
यावेळी मनोहर लोमटे, भगवान जाधव, संतोषकुमार बायस, जवाहर उपासे, मनोज महिंद्रकर, अमोल मेहता, प्रकाश तोरवी, इफ्तेखार नदाफ, वैभव होमकर, चंद्रमोहन बत्तूल, सिद्धाराम कोरे, काशिनाथ हरेगावकर, गणेश इंदापुरे, शैराज होमकर, रामकृष्ण येमुल, सुनील, दूधगुंडी यांची उपस्थिती होती.
स्थापत्य २०२५ प्रदर्शनाचा आज २३ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. हे प्रदर्शन नॉर्थकोर्ट मैदानावर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी केले आहे.