सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

सोलापूरचा दीपककुमार जोशी, मोहोळच्या महावीर कांबळेला अटक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना बेड्या

सोलापूर : प्रतिनिधी (अहिल्यानगर)

शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दीपककुमार जोशी (सध्या रा. वसंत विहार, सोलापूर, मूळ रा. पाटण, गुजरात) आणि महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) यांना अटक केली आहे.

२७ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत डवउ ऋश्वेलरन डशीळींळशी नावाने व्हॉट्सअॅपवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २०-३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने १ कोटी १० लाख ८० हजार रुपये गुंतवले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी तीन साथीदार प्रविण लॉहे, शिवाजी साळुंके आणि सागर कुलकर्णी यांचा सहभाग उघड झाला. या चौकशीतून राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, नागौर, राजस्थान) हा कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे वर्ग पाठवण्याचे काम करत असल्याचे समोर आले. त्याला १७ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. राजेंद्रच्या चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले. या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये रूपांतरित करून कंबोडियामध्ये पाठवले होते. त्याच्या सांगण्यावरून हवाला नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करणाऱ्या दीपककुमार जोशी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२.९२. लाख रुपये रोख, एक कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शना खाली सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, अरुण सांगळे, मोहम्मंट शेख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!