आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती निमित्त ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान पाणीदार आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या निमित्त ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी हॉटेल बालाजी सरोवर येथे पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पाणीदार आमदार नमूद असणारे मानाचा सोलापुरी फेटा बांधून भला मोठा हार घालून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी VVP कॉलेजचे चेअरमन अमोल चव्हाण, सचिन गुत्तेदार, निलेश कांबळे, महादेव राठोड, माणिक कांबळे, रवी नळगुंटले, यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराच्या सदस्यांची उपस्थिती होती.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रशासनात त्यांच्या शब्दाला खूप मोठे वजन आहे. सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातुन या पुढील काळात विकासात्मक निर्णय आपण घ्याल अशी अपेक्षा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने महायुती सरकारमधील सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात आपण काम करू अशी ग्वाही देखील याप्रसंगी आमदार तथा नवनिर्वाचित आमदार निवास व्यवस्था समिती अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.