मराठी भाषेचा अवमान केलेल्या भाई जोशींवर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेल्या राहुल सोलापुरकर व कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भैया जोशी नी मराठी भाषेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. चार हुतात्मा चौकात निषेध करण्यात आला. तसेच मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान प्रकरणी भैया जोशी, राहुल सोलापूरकर व कोरटकर यांच्यावर राष्ट्रद्रोह चा खटला सरकारने दाखल करावा, भैया जोशी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांचा धिक्कार असो, मराठी आमची माय, मराठी आमच्या रक्तात, मराठी आमच्या हृदयात..अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या निषेध आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तपंत वानकर,, दत्ता गणेशकर महेश धाराशिवकर, शरणराज केंगनालकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तसंच पदाधिकारी आणिलहू गायकवाड, रेवन पुराणिक, शशी बिराजदार, दत्ता माने, बाळासाहेब गायकवाड, अनिल जाधव, अजय खांडेकर, नाना मोरे, दत्ता खलाटे, डॉ शकील अत्तार, जरगीस मुल्ला, प्रकाश पवार, धनराज जानकर, चंद्रकांत मानवी,
शिवा ढोकले, राजेश वडीशेरला, रवी नागणकेरी, संगाप्पा कोरे, संतोष गंधुरे, संताजी भोळे, अनिल जाधव, राम वाकसे, मच्छिंद्र आयगोळे, बंटी बेलमकर, गणेश कर्वे, सागर कोळी, चीरु जाधव, रविकांत घंटे, मडीवालप्पा दहिटने, सखाराम वाघ, विश्वेश्वर गड्डम, सुरेश शिंदे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.