सोलापूर
बाळे येथे आमदार विजय देशमुख यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी, देशमुख यांच्यासाठी महायुती बाळे येथे एकीने लढणार
सोलापूर : प्रतिनिधी
शहर उत्तर महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळ येथे बुधवारी सायंकाळी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे परिसरातील नागरिक माता भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसभेला बाळे भागात भाजपचे उमेदवार यांना आम्ही लीड दिला होता. त्या पेक्षाही जास्त महायुतीतील सर्व पक्ष मिळून आम्ही एकदिलाने काम करू आमदार देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ.
येणाऱ्या विधानसभेत एक लाख मताधिक्याने शहर उत्तरच नाव गाजवू असे बाळे येथील भाजपचे कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे यांनी सांगितले.
विकास कामाच्या जोरावर आमदार देशमुख पाचव्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत बाळे भागात अनेक चांगले बदल मागील सात आठ वर्षात झाले आहेत. किनारा निवडणुकीत शहर उत्तर चा विजय हा आमचाच असणार असे माजी नगरसेविका ज्योती बमगुंडे सांगितले.