ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची तोफ सोलापुरात धडाडणार, 9 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा, संतोष पवार यांचे नियोजन

सोलापूर : प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख, स्टार प्रचारक, वक्ते यांच्या जाहीर सभा होत आहेत त्या माध्यमातून ते आपल्या पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत.
त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभा देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी 9 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन केले आहे.
या सभेवेळी माहिती देताना संतोष पवार म्हणाले, सोलापूर जिल्हयातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो तसेच बुद्धिजीवी सुजाण नागरिकांनो आरक्षणवाद्यांनो, हितचिंतक, बांधव एससी, एसटी, ओबीसी बांधव व पत्रकार बांधवांना यांना जाहीर आव्हांन करीण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार 9 नोहेंबर दुपारी 3:30वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर या ठिकाणी होणार असून सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जनतेला सुजाण बंधू आणि भगिनींना नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी असे आवाहन सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्व यूनिटच्या वतीने करण्यात आले आहे.