सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना उपदान व पेन्शन विक्री साठी ३९ कोटी रक्कम उपलब्ध

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन उपदान (ग्रॅज्यूटी) पेन्शन अंशराशीकरण (पेन्शन विक्री) रक्कम देण्यासाठी ३९ कोटी रक्कम प्रत्येक पंचायत समिती बीडीओ खात्यात जमा करण्यासाठी बीडीएस काढण्यात आली असल्याचे माहीती सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष फुलारी यांनी दिली आहे.
या पूर्वी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिवानंद भरले सरचिटणीस रामराव वराड (हिंगोली) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या कडे ३१ मे २०२४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन अंशराशीकरण व उपदाना साठी अनुदान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्या प्रमाणे राज्य प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेला सुमारे १२०० ते १३०० कोटी रक्कम अनुदान उपलब्ध केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षणासाठी ३९ कोटी रक्कम प्राप्त झाली आहे ते आज जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती बीडीओ खात्यात जमा करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड, सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ, काळप्पा सूतार, बसवणप्पा जिरगे, भिमाशंकर म्हेत्रे, बादशहा मुल्ला यांनी पाठपुरावा केले या वेळी जिल्ह्यातील ११०० शिक्षकाचें वैद्यकीय बीलासाठीही पाठपुरावा केले.