
सोलापूर : प्रतिनिधी
हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काऊंटरच्या बाजूला बसलेल्या एका युवकाने अल्पवयीन बालिकेला स्वत:जवळच्या मोबाइल मधील अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती केली. आरडा ओरडा झाल्याने तो पळाला. मात्र, वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास धक्कादाजक प्रकार घटना घडली.
अहेमद जकेरिया मोहम्मद अयुब शेख, वय २५, व्यापारी, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, यातील अल्पवयीन व फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामास आहे. फिर्यादी रिसेप्शन काऊंटरजवळ अभ्यास करीत बसलेली होती सायंकाळी सहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे असा बहाणा करुन एक तरुण आला. त्याने पीडितेला विचारणा करता डॉक्टर सायंकाळी ७ वाजता येतात म्हणून सांगितले.
पीडितेने त्याला सांगूनंही तेथेच थांबला आणि आपल्या मोबाइलमधील व्हिडीओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली. काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडिओ असल्याचे लक्षात आले तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करीत होता. दरम्यान, फिर्यादी बालिकेने बहीण मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले. घाबरून सदरची माहिती सांगितली. तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमूद युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला.