
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिका माजी महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांनी भवानी पेठ, गंज पेठ आधी भागात पद्मशाली बांधवांची गाठीभेटी घेऊन प्रचार केले.
बैठकीचा आयोजन करण्यासाठी उद्योजक पद्मशाली समाज उत्सव प्रमुख संजय मंचे यांनी पुढाकार घेतले .पद्मशाली पंच कमिटी भवानी पेठ सरपंच वसंतराव येमुल, ज्ञानेश्वर बोड्डू, मनीष आंदे, महेश चनमल, रमेश सरगम, राजेंद्र आडप, विलास मध्ये, गणेश शेरला, माजी नगरसेवक मनीश साळुंखे, चंद्रकांत मंचे, रवींद्र सिरसुल, क्रांती खांडरे, अनुराधा मंचे, लक्ष्मी कोंडा महिला पदाधिकारी उपस्थित होते.
पद्मशाली पंच कमिटी गंज पेठ येथे कैंची विडी उद्योग समूहाचे प्रमुख व सरपंच सोमनाथ शेठ कैंची, पंच कमिटीचे अध्यक्ष विनोद तुकाराम जालगी, सचिव मोहन व्यंकटेश येरवा, विश्वस्त उमाकांत बाळासाहेब दिड्डी, विश्वस्त रविंद्र सिद्राम भंडारी, विश्वस्त तुळशीदास नामदेव काडगी, सतिश साका, अशोक बोगम, युवक संघटना माजी अध्यक्ष दिनेश लक्ष्मण दोमा, माजी विश्वस्त मुकुंदराव शिंगाराम, बद्रीनाथ जन्नु, अशोक दुडम, सुनिल जाना, सुहास मंचे उपस्थित होते.
या प्रचारार्थ उद्योगपती श्रीनिवास चिलका, सोमनाथ इंदापुरे सिद्धेश्वर कमटम, सुरज चौहाण, त्रिमूर्ती बल्ला, प्रवीण पेद्राम उपस्थित होते.