
सोलापूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी जन्मलेल्या १२ मुला-मुलींच्या नावे फिक्स डिपॉझिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवजात बालकांना पाळण्यासह डोक्याची टोपी व अन्य साहित्य भेट देण्यात आले. सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थापक दीपक गवळी, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समाधान भिसे, उपअधीक्षक विनायक डोईजोडे, प्रमोद गायकवाड, मेघना कोरके, मीरा सर्वगोड, सागर शितोळे, अजय नागमोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष राहुल सोनवणे, आकाश सोनवणे, विशाल सोनवणे, अजय कांबळे, सूरज गवळी, दावीद जगले, अजय म्हेत्रे, मारुती गवळी, ईश्वर कांबळे, सुजन वडीपल्ली, ऋषिकेश विटेकर, रवी पोतराज, कलीपा माढेकर, मंथन जानवेकर, अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेतले. रुक्मिणी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.