आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे 1 हजार लोकांना मकर संक्रांतीच्या निमित्त अन्न वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरच्या ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरच्या योगदंड विवाहसोहळया निमित्ताने विविध पुजा विधी व उत्सव साजरे करण्यात येतात परंतु समाजातील आजही एक वर्ग असा आहे जो वंचित आहे. दररोजच एकवेळच्या अन्नासाठी संर्घष करावा लागत असताना. मकर संक्रांती सारख्या सणाला गोडा धोडाच विचार ही करु शकत नाहीत उदाहरणार्थ अंध, अपंग, भिक्षुक तसेच कुष्टरोगी वसाहतीतील महिलांना आस्थाच्या वतीने मकर संक्रांती निमित्ताने शेंगा पोळी, कडक भाकरी, गरग्गट्टा, पुलाव अश्या मेनूच वाटप करण्यात आले.
सिव्हिल हाॕस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पण मकर संक्रांती हा सण मेनू निमित्ताने का होईना साजरा केल्याचा आनंद मिळावा म्हणून ह्या मागचा उद्देश आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती सोलापुर चे पोलिस DCP राजन माने, सौ.नंदा गोविंद लाहोटी यांच्या वतीने आजचा शिधा व स्वीट देण्यासाठी रोख रक्कमेची मदत करुन वाढदिवस साजरा केला.
प्रमुख पाहुणे DCP राजन माने यांनी प्रथमता मकर संक्रांतीच्या शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगत म्हणले की आस्था रोटी बँक नेहमीच तळागाळातील लोकांना मदत करते व त्यांचे काम खूप छान आहे व त्यांनी आस्था रोटी बँकेच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिले अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असेही म्हटले.
हया प्रसंगी आस्थाच्या वतीने सभासद निलीमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संगिता छंचुरे, स्नेहा वनक्रुद्रे, निता आक्रुडे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापुरकर, सुरेखा पाटील, सुर्वणा पाटील, माधुरी बिरादार, विद्या माने, विजय पाटील, तसेच संस्थेचे सर्वेसर्वा विजय छंचुरे व पुष्कर पुकाळे आदी उपस्थित होते.
हया वर्षातला पहिला मोठा सण पण परिस्थितीमुळे काहीजण रूग्णालयात नातेवाईकांच्या सेवेत तर काही वंचित ज्यांना एकवेळच जेवण ही मुश्किलेने मिळते त्यांनी आपल मत व आभार वक्त केला तो क्षण डोळयात पाणी आणणरा होता खरोखरच आस्थाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मनोगत कमिशनर सरांनी व्यक्त केले. आणि आस्था रोटी बँकेतर्फे सोलापुरातील जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..