राजकीय

सोलापुरच्या लेकीचे जोरदार शक्तीप्रदर्शन, हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती, लोकसभेच्या युदधासाठी तुमचे आशीर्वाद द्या.

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, शिवसेना नेते उत्तमप्रकाश खंदारे, भगिरथ भालके, आदि मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी सोलापुरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.

प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली. ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हील चौक, बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली. रॅलीच्या सुरूवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला.

प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, विश्वनाथ चाकोते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बरडे, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, गणेश वानकर, यु एन बेरिया, अमर पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, एम एच शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश हसापूरे आदी मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!