
सोलापूर : प्रतिनिधी
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मागील काही दिवसापासून सोलापूर शहर आणि परिसरात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती..
मतदान केंद्रावर जशी मतदाराची गर्दी दिसून होती ती तशीच गर्दी राजकीय नेत्यांची देखील गर्दी पहावयास मिळत होती. सम्राट चौक येथील दमानी प्रशालेत मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख हे आले असता, याच मतदान केंद्रावर आनंद चंदनशिवे देखील होते.
आनंद चंदनशिवे आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकाच विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असल्यामुळे यांच्यामध्ये राजकीय वैरत्व होते पण काही दिवसापूर्वी महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील लोकप्रतिनिधीने आपले राजकीय द्वेष बाजूला सारत एकत्रित येताना दिसून आले.
आनंद चंदनशिवे आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित पणे दमानी प्रशाला, श्राविका हायस्कूल आधी परिसराती मारवाडी आणि दलित समाजाच्या मतदाराचा टक्का भाजपाच्या बाजूने मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक दिलीप कोल्हे साक्षीने प्रयत्न करताना दिसून आले. देशमुख आणि चंदनशिवे यांच्या एकत्रित येण्याने मागील मताच्या टक्केवारीत किती फरक पडणार याकडे राजकीय जाणकाराचे लक्ष लागून राहीले आह