
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप मित्र पक्षाकडून राम सातपुते आणि काँग्रेस मित्र पक्षाकडून प्रणिती शिंदे यांच्यासाठी आज मतदान करून घेण्यात कार्यकर्त्यांमध्ये चुरस पहावयास मिळत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि मध्य मतदारसंघात मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
भवानी भवानी पेठ येथे भाजप नेते राजकुमार पाटील म्हणाले, सकाळ पासून मतदानासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अशीच गर्दी कायम राहिली तर सर्वाधिक मते भाजपाला पडून भाजप उमेदवार निवडून येणार यात शंका नसल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे म्हणाले, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मतदान देणार. विडी घरकुल भागातील मतदान केंद्रावर प्रशासनाचे नियोजन नसल्याचे दिसून येते मतदार हे उन्हामध्ये रांगा लावून मतदार करण्यासाठी उभे आहेत त्यांची सोय प्रशासनाने केली पाहिजे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे भाजपवर टीका करताना म्हणाले, दोनदा पुंगी वाजली तिसऱ्यांदा वाजणार नाही आमदार प्रणिती शिंदे या एक लाख ते एक लाख वीस हजार मताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.