संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनवाणी पायाने फिरणार्या रस्त्यावरील गरजवंतांना पादत्राण्याचे वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा फुले व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने गरजवंतांना उन्हामुळे भाजलेल्या पायांना वाहनांच संरक्षण मिळावं या हेतूने पादत्रानाचे वाटप शहरातील विविध भागात करण्यात आले.
शहरात अनेक भागात गोरगरीब मनोरुग्ण अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करत फिरताना आढळून आले होते अशा गरजवंतांचा शोध घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने होडगी रोड, सात रस्ता, रेल्वे टेशन, एसटी स्टँड, सिद्धेश्वर मंदिर आदी परिसरातील रस्त्यावर फिरणाऱ्या गोरगरिबांना गरजूंना चप्पल देऊन सामाजिक भान जपण्यात आले.
यासाठी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक प्रमोद पवार यांचे सहकार्य लाभले यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर सचिव सिद्धाराम शहर संघटक सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.