राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इरफान शेख यांनी केला खुलासा, चुकून माझ्या तोंडातून शब्द निघाले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी हे बोललो नाही
या उलट महायुतीचा उमेदवार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मी माझ्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होतो, जाणून बुजून त्रास देण्यासाठी मला नोटीस बजावली : इरफान शेख

सोलापूर: प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इरफान शेख यांनी सोलापूर लोकसभा महविकास आघाडी उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याप्रकरणी त्यांना पक्षाच्या वतीने नोटीस देत 24 तासात खुलासा देण्यास सांगितले होते त्यावर इरफान शेख यांनी खुलासा देताना असे म्हणाले, मुस्लिम धर्मात पवित्र रमजान महिन्यात लहान मोठे, माताभगिनी ज्येष्ठ बुजुर्ग लोक पारंपारिकपासून दर सालाबादा प्रमाणे रमजान उपासन करतात. त्यामूळे सर्व पक्षीय, सर्व धर्मीय प्रमुख लोकांकडून रोज इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे रमजान महिन्यात बाबा कादरी मस्जिदमध्ये रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या मस्जिदचे ट्रस्टीने मला सदर रोजा इप्तार कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण दिलेले आहे व मी एक समाजाचा घटक म्हणून त्या रोजा इप्तार पार्टीला गेलेलो होतो. त्या ठिकाणी मी एक समाजाचा घटक म्हणून मला बोलण्याची विनंती केली असता मी त्यावेळी बोलताना चुकून माझ्या तोंडातून शब्द निघाले आहे. परंतू मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून बोललो नाही.
सदर रोजा इप्तार पार्टी झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने महायुती सोबत मिळून निवडणूक लढवित असल्याने महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यासह व आपल्या पक्षाचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने, शहर अध्यक्ष संतोष पवार, किसन जाधव, आनंद चंदनशिवे यासह व इतर प्रमुख मान्यवरांसह मी रॅलीमध्ये सहभागी होतो. तसेच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे किसन जाधव व इतर प्रमुख कार्यकर्त्याच्या भेटीसाठी आले असता मी त्या ठिकाणी उपस्थितीत होतो व त्यांचे स्वागत केलो हे आपणास माहित असून देखील जाणुनबुजून मला त्रास देण्यासाठी आपण सदरचा कारणे दाखवा नोटीस काल दि. १९/०४/२०२४ रोजी दुपारी ३.२३ वाजता मला व्हॉटसअप्द्वारे पाठविले आहे. तरी मी पक्षाचा कोणताही आदेशाचा अवमान अथवा भंग केलेला नाही. त्यामुळे सदरचा खुलासा करीत आहे. असे म्हणत त्यांनी आपला खुलासा पक्षाकडे दिलाय.