नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, युवती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

सोलापूर : प्रतिनिधी
कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ समाजातील महिला मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी, शांत, हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता. तो सतत तिच्या मागावर असायचा, अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितले होते. तिच्या घरच्यांनी ह्या नराधमाला अनेकदा ताकीद देवुन सुद्धा नेहाच्या मनाविरूद्ध हा नराधम वागत होता. नेहा त्याला भिक घालत नाही. याचा राग मनात ठेवून ह्या नराधमाने नेहाचा खुन करून बळी घेतला.
या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. प्रारंभी नेहा हिरेमटीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रंजीता चाकोते, पुष्पा गुंगे, राजश्री थळंगे, सिंधुताई काडादी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा गुंगे, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे, बसव केंद्र अध्यक्षा सिंधुताई काडादी, अक्कनबळग महिला मंडळ मड्डी वस्ती रुपा चडचणकर, शंकर लिंग महिला मंडळ इंदुमती हिरेमठ, राजश्री थळंगे, दानेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा राजेश्वरी भादुले, वीरशैव व्हिजन महिला आघाडी माधुरी बिराजदार, प्रिया बसवंती, पद्मा वेळापुरे, शोभा नष्टे, चंद्रिका चव्हाण, शैलजा पूर्वंत सुजाता बुट्टे वर्षा विभुते, माजी महापौर शोभा बनशेट्टी, रूपा कुताटे विद्या जोडभावी निर्मला कणगी सविता हावळेगी वैशाली भैरप्पा धनश्री स्वामी नीलम पाठक शिल्पा गणेशारी राजश्री गणेशारी मधुमती किनीकर राजश्री लोकापुरे सुनिता कोरे श्रावणी दर्गोपाटील साक्षी हौदे रूपा तंबाके सुवर्ण तंबाके महादेवी तेली निर्मला लातूरे निर्मला बिराजदार शैला किनगी दीपा कारंडे उपस्थित होते.