
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासपा, रयत क्रांती संघटना, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर उत्तर चे आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 6 दमाणी नगर, पावन गणपती परिसर, जानकर वस्ती यासह आजूबाजूच्या परिसरात होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक घरोघरी जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकास कामे सांगत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
याप्रसंगी शहर सरचिटणीस शेखर फंड, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष रेखाताई गायकवाड, मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, OBC सेल शहराध्यक्ष राम वाकसे, युवा मोर्चा प्रदेश प्रमुख प्रकाश घोडके, शहर उत्तर सरचिटणीस जगन्नाथ चव्हाण, सुजित चौगुले, मनोज पवार, मनिष घुले, विशाल शिंदे, लखन कांरडे, गोपी घोडके, बालाजी लोहार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपरवारीयर्स, बूथप्रमुख, नागरिक उपस्थित होते.