गौडगावच्या मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्त भक्तांची अलोट गर्दी
महाराष्ट्रसह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा विविध राज्यातील भक्तगणांची दर्शनासाठी अलोट गर्दी

सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्त २२ व २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजविण्यात आले होते. कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रसह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.
२२ एप्रिल रोजी सायंकाळी भजन व कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार हा श्री मारुतींचा जन्मदिवस हा योग जुळून आल्याने भक्तांची मांदीयाळी दिसून आली. दरम्यान हनुमान जयंती निमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक, गजलक्ष्मी पूजा शनी पूजा होम हवन व यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सात वाजता श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महापूजा व महाआरती कार्यक्रम संपन्न झाला.नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुतींची आहे हनुमान जयंती निमित्त श्रींचा उत्सव मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितले. हनुमान जयंतीनिमित्त विविध राज्यातून हजारो भक्त दर्शनासाठी गोडगाव येथे दाखल होत असतात यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी शौचालय आणि भक्तनिवास अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे दर्शनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने नीटनेटके नियोजन करून दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, प्रकाश मेंथे, सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे, चौडप्पा सोलापूरे,भारत ननवरे, परमेश्वर सुतार, ज्ञानेश्वर फुलारी, नंदकुमार वाघमोडे, शरणाप्पा बमदे,बिरप्पा पुजारी,रमेश वाघे, श्रीमंत सवळतोट, मल्लिनाथ पाटील, मल्लिनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती. मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली.