महिला व नवजात शिशुंसाठी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, औषधे उपलब्ध असून गरीब, गरजूंनी लाभ घ्यावा : डॉ. जयश्री ढवळे (वैद्यकीय अधिक्षक, महिला व नवजात शिशु रुग्णालय)
डॉक्टर सर्व कर्मचारी यांच्याकडून अतिशय उत्तम व दर्जेदार सेवा मिळाली. आम्ही जणू खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय असे वाटले. सर्व सामान्य नागरिकांनी येथे सेवा घ्यावी : शारदा सुरवसे (जिल्हा लातूर)

सोलापूर : प्रतिनिधी
महिला व नवजात शिशु रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया (सिझेरियन) होवून प्रसूत झालेल्या आई व नवजात कन्येचे स्वागत करण्यात आले आहे. गुरुनानक चौकात १३ मार्च २०२४ रोजी महिला व नवजात शिशुंसाठी नवीन शासकीय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.त्यामध्ये गरोदर मातांची तपासणी, प्रसुती, शस्त्रक्रिया व नवजात बालकांची देखभाल करण्यात येते. त्यासाठी लागणारी सर्व अद्ययावत यंत्रसामुग्री, शस्त्रक्रिया कक्ष नव्याने सुरु करण्यात आले आहे. पहिली शस्त्रक्रिया (सिझेरियन) शरयु दीपक सुरवसे जवळगा (सिंधी,जि.लातूर) यांच्यावर सोमवारी (ता.१५) एप्रिल रोजी करण्यात आली होती.प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत करुन त्यांना शासकीय वाहनातून मंगळवारी (ता.२३) सुखरुप घरी सोडले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षिरसागर, वैद्यकीय अधिक्षक जयश्री ढवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, स्रीरोग तज्ञ डॉ. आशा घोडके, बालरोग तज्ञ डॉ. मुकुंद माने, दंतरोग तज्ञ डॉ. वायचळ, अधिसेविका दीपाली काळे, परिसेविका शितल ओहाळ, शुभांगी पडवळ यांच्यासह अन्य कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.