सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अखेर ब्राह्मण समाजाच्या लढायला यश, भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर, 50 कोटी रुपयांची महामंडळासाठी तरतूद

सोलापूर : प्रतिनिधी

मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे ही मागणी आज राज्य सरकारने तातडीने मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे, आमदार नमीता मुंदडा आदी उपस्थित होत्या.

गेल्या अनेक वर्षापासून समस्त महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाची मागणी होती हे ब्राह्मण समाजाला भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे व इतर अशा इतर मागण्यांसाठी गेले अनेक वर्ष ब्राह्मण समाज आंदोलन करून राज्य सरकारकडे आपली मागणी करत होता.

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ मंजूर करण्यात आले 2018 साली मुंबईच्या आझाद मैदानावरती भव्यदिव्य असे आंदोलन प्रा काकासाहेब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते त्यावेळी हजारो समाज बांधवांसह मोठ्या आंदोलनाची हाक यावेळी देण्यात आली होती.

ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी, निखिलजी लातूरकर, दीपक रणवरे, मकरंद कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, अर्चना सरुडकर, संजीवनी पांडे, विजया कुलकर्णी यांच्यासह अनेक समाज बांधवांनी वेळोवेळी प्रयत्न केले. असे म्हणत सरकारचे आभार समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र समन्वयक प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!