सोलापूरच्या भाकरी फॅक्टरी मधून महिलांना रोजगार देण्याचे भतगुनकी यांचे कार्य कौतकास्पद : सुशीलकुमार शिंदे
ड्रीम फौंडेशनच्या जिजाऊ महिला मंच आयोजित उपक्रमाचे सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून उद्घाटन

सोलापूर : प्रतिनिधी
जिजाऊ महिला मंच तर्फे भाकरी फॅक्टरी निर्मित गरम भाकरी विक्री केंद्र शुभारंभ व सुशील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उद्घाटन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी 11 वा ओम गर्जना चौक जुळे सोलापूर येथील ड्रीम शिक्षण संकुलात पार पडला.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ड्रीम फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवाशक्तीला बळकट करण्यासाठी अखंड कार्य करीत आहेत स्पर्धेच्या युगात युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती महिलांना स्वयं रोजगार आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी कोरडा पार्टी या अभिनव प्रकल्पातून आर्थिक सक्षमीकरण व रोजगार निर्मिती हे काम कौतुकास्पद आहे. डॉक्टर कलामांचे प्रेरणा घेऊन बदल की यांनी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वादाने चांगले कार्य करत असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे सांगून डॉक्टर कलाम यांच्या सोबतचे जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काशिनाथ भतगुणकी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तरुणांनी स्वयंरोजगारातून नऊ उद्योग निर्माण करून राष्ट्र उभारण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास मातोश्री सौ गजराबाई भतगुणकी, गुरुषांत भतगुणकी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, उद्योजक राजू आसादे, सुनंदा व्हटकर, सिद्धाराम दूनगे, मल्लिकार्जुन नरोणे, अशोक सोनकांतले, तानाजी पाटील, सचिन मस्के, संतोष धोत्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वशिष्ठ सोनकांबळे यांनी केले प्रास्ताविक संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी केले तर आभार सिद्धाराम डूनगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ महिला मंच सदस्य आणि ड्रीम फाउंडेशन कार्यकर्ते परिश्रम घेतले.