फिर एक बार मोदी सरकार, यंदा खासदार तुम्हीच होणार अशा घोषणा देत विडी कामगारानी लोकसभा विजयासाठी राम सातपुते यांना दिल्या शुभेच्छा.
सोलापूरच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे शिलेदार राम सातपुते यांना मोठ्या संख्येने निवडून द्या : विजयकुमार देशमुख (आमदार भाजप)

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात सोलापूर शहर उत्तर विधानसभा कार्यक्षेत्रातील अल्ली महाराज हॉल आणि केकडेनगर विडी घरकुल येथील विडी कामगारांची आमदार विजयकुमार देशमुख, महायुतीचे लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भेटी घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही ठिकाणी नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या दरम्यान “फिर एक बार मोदी सरकार” “यंदा खासदार तुम्हीच होणार” अशा घोषणा देत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोदी सरकारची कामगिरी, गरिब कल्याणाच्या योजनांमुळे सामान्यांचं सुखकर होत असलेलं जीवन, देशात सुरु असलेली विकासकामे यासह विविध बाबींची माहिती दिली. सोलापूर मतदार संघाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महायुतीच्या शिलेदाराला मोठ्या संख्येने निवडून द्या असे आवाहन केले.
आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने वास्तवाचे भान ठेऊन आपलं योगदान द्यावे आणि पंतप्रधान मोदीना पंतप्रधान करताना सोलापूर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पडावे, यासाठी एकजूटीने लढण्याचे आवाहन मी यावेळी संबोधित करताना केले.
या प्रसंगी विजय तोंडगल, विनोद केंजरला, रवि नादरगी, सतिश सिरसिला, शेखर इगे, रुचिरा मासम, मोठ्या संख्येने विडी कामगार, माता भगिनी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.