राजकीय

भाजपमुळे सोलापूर विकासापासून वंचित महाविकासच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, अक्कलकोट तालुक्यात गावभेट दौरा

अक्कलकोट तालुक्यात गावभेट दौऱ्यात शिंदखेडे, हसापूर, दोड्याळ या गावांना दिली भेट

सोलापूर : प्रतिनिधी

भाजप सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सोलापूर जिल्हा विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यात गावभेट दौरा केला. या गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे, हसापूर, दोड्याळ या गावांना भेटी देण्यात आल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिंदखेडे गावकऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे उत्साहात स्वागत केले. आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून यावेळी शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे, असा निर्धार आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धार्थ गायकवाड व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शिंदे यांनी हसापूर (ता. अक्कलकोट) या गावाला भेट दिली. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचे मागील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरले. अक्कलकोट तालुक्याचा पाणीप्रश्न कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काँग्रेसला संधी द्या. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दोड्याळ (ता. अक्कलकोट) यां गावाला भेट दिली. गावकऱ्यांकडून उत्साहात स्वागत आले. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, मतदारसंघातून महाविकास आघाडीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. यावरून या निवडणुकीत बदल होणार आहे. महाविकास आघाडीच जिंकणार याची खात्री पटते, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!