बापूसाहेब सदाफुले यांच्या प्रयत्नाला यश, २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्या संदर्भात काय झाला निर्णय.?

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने १५ जानेवारी २०२५ रोजी समक्ष भेटून चर्चा करून निवेदन पत्र सादर केले असता राज्याचे प्रधान सचिव गोविंदराज, सहसचिव अनिरुद्ध जवळीकर, कक्ष अधिकारी शिल्पा कवळे यांची ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली.
राज्याचे प्रधान सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी यांनी ट्रेड युनियनच्या निवेदन पत्राची दखल घेऊन सोमपा प्रशासनास फेर दुरुस्ती प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने १६ जानेवारी २०२५ रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासनास नगर विकास खात्याचे पत्र प्राप्त झाले आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून युनियनच्या माध्यमातून गेली पाच वर्ष २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नगर विकास खात्याकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले आहे.
यापुढील युनियनचे ध्येय धोरण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक लावून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी सांगितले. यावेळी राम चंदनशिवे, सुनील शिंदे, सायबणा हदीमनी, धनाजी लोंढे उपस्थित होते.