सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, सोलापुरात देवेंद्र समीकरण तयार होत आहे विजयकुमार पिसे यांचे प्रतिपादन

देवेंद्र कोठे यांचं कार्य स्तुत्य भाजपा महिला अध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली, बालभारती आणि आंध्रभद्रावती शाळेत वह्या वाटप

सोलापूर : प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बालभारती विद्यालयात तसेच आंध्रभद्रावती विद्यालय येथे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने 54 हजार वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बालभारती विद्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे, श्री मार्कंडेय गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश संगा, उद्योगपती अन्नलदास, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी जक्कप्पा कांबळे, राजशेखर येमुल, रवी भवानी, अंबादास सकिनाल, अभिषेक चिंता, शाळेची संस्थापक हाजी शब्बिर शेख, शाळेचे मुख्याध्यापक रिजवान शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे म्हणाले, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि सोलापुरातही देवेंद्र असे समीकरण आता तयार होत आहे. उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते देवेंद्र कोठे यांनी वह्या वाटपाचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. श्रमिकांच्या मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या मिळत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे पिसे यांनी कौतुक केले.

युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कार्यासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. समाज उपयोगी कार्यक्रमातून वाढदिवस साजरा झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. वर्षभर सामाजिक उपक्रमात व्यस्त राहायला हवे अशी शिकवणही माझे आजोबा, ज्येष्ठ नेते स्व. विष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडून मिळाली आहे.

राजकीय पद लोकांच्या कामासाठी, भल्यासाठी कसे वापरता येईल याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा 54 वा वाढदिवस असल्याने 54 हजार वह्या वाटप करण्यात येत आहेत. कष्टकरी कामगारांच्या मुलांना या वह्या वाटप केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यानंतर समाजासाठी जे काही करता येईल ते करण्या साठी पुढे यावे. गरीब मुलांचे शिक्षणासाठी हातभार लावायला हवा.

बालभारती विद्यालय येथील उपस्थिती जक्कप्पा कांबळे, राजशेखर येमुल, सुनील पाताळे, रवी भवानी, नरसिंग सरला, सिद्राम थट्टे, विजय महिंद्रकर, विश्वनाथ प्याटी, अभिजीत बुक्कानुरे, श्रीधर देवरकोंडा, आनंद गदगे होते.

आंध्रभद्रावती शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सावित्रा पल्लाटी, माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, सामाजिक कार्यकर्ते आनंद बिर्रू, नागेश सरगम, श्रीनिवास जोगी प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन मोरडे, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कामगारांच्या मुलांना वह्या मिळत असल्याबद्दल माजी नगरसेविका विजया वडेपल्ली यांनी देवेंद्र कोठे यांचे आभार मानले. त्यांनी भविष्यातील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी कोठे यांना शुभेच्छा दिल्या.

आंध्र भद्रावती प्रशाला येथे उपस्थित आनंद बिर्रू ,श्रीनिवास जोगी,सिद्धेश्वर कमटम अभिषेक चिंता,अंबादास सकीनाल, विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य पवन खांडेकर, सिद्धेश्वर कमटम किरण कमटम, शैलेश कडदास, अमन दुबास त्रिमूर्ती बल्ला,उदय कणकी,श्रीधर सुतार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे उपक्रम यशस्वी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!