“है तैयार हम” सुरेश हसापुरे यांनी ठोकला शड्डू

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, २५१- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.
सुरेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात केलेली विकास कामे, त्यांचा असणारा संपर्क, लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांचा केलेला प्रचार यासह अनेक जमेच्या बाजू असल्याने आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी सुरेश हसापुरे यांनी केली.
यावेळी संगमेश बगले, मोतीराम राठोड, बनसिद्ध बन्ने, तिरुपती परकीपंडला, सुभाष पाटोळे, जयशंकर पाटील, संतोष पवार, श्याम व्हनमाने, शिवलिंग बगले, सुधाकर जोकारे, केरू बंडगर, विश्वनाथ जोकारे, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.